WL (वेटिंग लिस्ट)
तुमचं तिकीट रांगेत आहे पण अजून बर्थ मिळालेली नाही. जर ते e-ticket असेल आणि चार्ट तयार होईपर्यंत WL च राहिलं, तर ते आपोआप रद्द होऊन रिफंड मिळतो, त्यामुळे त्यावर प्रवास करता येत नाही. WL 5 म्हणजे त्या कोट्यात तुमच्या पुढे पाच जण आहेत.